हप्ता न मिळाल्याने अमरावतीत ‘लाडक्या बहिणीं’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)। महापालिकेची निवडणूक संपून बराच काळ लोटला तरी ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने अमरावतीत महिलांचा संताप उफाळून आला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो लाडक्या बहिणींनी भव्य मोर्चा काढत जोरदार आंदोल
महापालिका निवडणुकीनंतरही हप्ता न मिळाल्याने अमरावतीत ‘लाडक्या बहिणी’ आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा


अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)।

महापालिकेची निवडणूक संपून बराच काळ लोटला तरी ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने अमरावतीत महिलांचा संताप उफाळून आला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो लाडक्या बहिणींनी भव्य मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. तात्काळ थकीत हप्ता देण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. ई-केवायसीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. अवघ्या आठ दिवसांत ई-केवायसीची वेबसाईट बंद करण्यात आल्याने अनेक महिलांना नोंदणी करता आली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच काही प्रकरणांमध्ये ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली गेल्यामुळे जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याचेही महिलांचे म्हणणे आहे.या अन्यायकारक कारवाईविरोधात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी आणि थकीत रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी, अशी मागणी लावून धरली. खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांवर आर्थिक संकट ओढावल्याचे यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देत लाडक्या बहिणींनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने चर्चेचे आश्वासन दिले असले तरी ठोस निर्णयाची प्रतीक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande