
लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)।
क्रीडा विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम खेळ व खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी काम करण्याचे ठरवले त्यानुसार खेळांना व खेळाडूंना मंजूर असलेल्या तरतुदी पेक्षा दहापट अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले सर्वसामान्य खेळाडूंना यामुळे न्याय मिळत असल्याचे मत माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र शासनाच्या युवक सेवा संचनालय व लातुर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शाळेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा उत्सहात संपन्न झाल्या.यावेळी बोलत होते.
यात १४, १७ व १९ वर्षाखालील मुला मुलींमध्ये कोल्हापूर, नाशिक व अमरावतीचे संघ अव्वल ठरले आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोविंदराव केंद्रे,माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्राचार्या ज्योती स्वामी, टेनिस व्हॉलीबॉल जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, आंतरराष्ट्रीय लेखक व दिग्दर्शक संतोष राम, महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य सरचिटणीस गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, राज्य सहसचिव मिलिंद कुलकर्णी, संस्थापक सदस्य प्रा. रमाकांत बनसोडे, संजय ठाकरे, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. ओमप्रकाश साकोळकर, प्रा. डॉ. बस्वराज धोतरे, नारायण रोडगे, मनोज साकोळकर, देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर, असोसिएशनचे सचिव जयराज धोतरे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात प्रथम कोल्हापूर, व्दितीय नाशिक तर तृतीय छत्रपती संभाजीनगर तर मुलींच्या स्पर्धेत प्रथम कोल्हापूर, व्दितीय अमरावती तर तृतीय पुणे यांनी मिळवला. १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात प्रथम नाशिक, व्दितीय अमरावती तर तृतीय छत्रपती संभाजीनगर तर मुलींच्या स्पर्धेत प्रथम कोल्हापूर, व्दितीय मुंबई तर तृतीय येण्याचा मान नाशिकने मिळवला.१९ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात प्रथम अमरावती, व्दितीय नाशिक, तृतीय छत्रपती संभाजीनगर तर मुलींच्या स्पर्धेत प्रथम नाशिक, व्दितीय कोल्हापूर तर तृतीय येण्याचा मान छत्रपती संभाजीनगरने मिळवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis