अंबाजोगाईच्या स्वच्छता निरीक्षकाची नगरसेवकाशी हुज्जत
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)। अंबाजोगाई नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. विकास रामकृष्ण काकडे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरच्या आतील झाडांना नियमित पाणी न मिळाल्यामुळे ती झाडे सुकत असल्याचा गंभीर व सार्वजनिक हिताचा विषय मुख्याधिकारी
The sanitation inspector of Ambajogai got into an argument with a corporator.


बीड, 19 जानेवारी (हिं.स.)।

अंबाजोगाई नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. विकास रामकृष्ण काकडे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरच्या आतील झाडांना नियमित पाणी न मिळाल्यामुळे ती झाडे सुकत असल्याचा गंभीर व सार्वजनिक हिताचा विषय मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या निदर्शनास आणून दिला.

माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी उर्फ पापा मोदी यांनी सांगितले की,

या वेळी नगरपरिषदेतील स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी लोकनिर्वाचित नगरसेवक ॲड. काकडे यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच त्यांचा अपमान केला. ही घटना अत्यंत निंदनीय असून लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचा होणारा हा अपमान आम्ही जाहीरपणे निषेध करीत आहोत.असे माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांनी सांगितले

स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांची बदली वारंवार झाल्यानंतरही ती रद्द करून पुन्हा अंबाजोगाई येथे रुजू होण्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी यापूर्वीही वरिष्ठ अधिकारी, स्वच्छता कामगार व कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याच्या तक्रारी आहेत.

आता थेट लोकनिर्वाचित नगरसेवकांशी अर्वाच्य भाषेत वागण्याची ही घटना अत्यंत गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

अन्यथा या प्रकरणात लोकविकास महाआघाडीच्या वतीने सर्व कायदेशीर बाबी तपासून योग्य ती भूमिका घेत तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande