साेलापूर जिप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित लढणार आहे. एकत्रित लढत असताना भाजप सोडून अन्य पक्षाला सोबत घेतले जाणार आहे. कोणत्या तालुक्यात कोणाला सोबत घ्यायचे? याचे
ZP news solpaur


सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)।

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित लढणार आहे. एकत्रित लढत असताना भाजप सोडून अन्य पक्षाला सोबत घेतले जाणार आहे. कोणत्या तालुक्यात कोणाला सोबत घ्यायचे? याचे अधिकार तालुका पातळीवर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार व माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासोबत बारामतीत झालेल्या बैठकीत झाला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झाली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, मोहोळचे आमदार राजू खरे, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande