
सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)।
नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भाजपचा नगराध्यक्ष करण्यात अपयश आल्यामुळे भारतीय जनता पार्टी नेत्यांनी सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सावध पावले टाकत एक जिल्हा परिषद गटात सोडत परिचारात गटाशी जुळवून घेतले त्या जागेवर अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मध्ये भाजपचा झालेला पराभव हा युती होण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू असून समविचारी आघाडीची दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी नगरपालिका निवडणुकी अगोदर समविचारी आघाडीची बैठक घेतली मात्र त्या बैठकीत झालेल्या किरकोळ कुरबुरीमुळे त्यांनी नगरपालिका निवडणुकीतून अंग काढले त्याचाही फटका देखील नगरपालिका निवडणुकीत भाजपला बसला अशा परिस्थितीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पाहता समविचारी आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने दामाजी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत समविचारी आघाडी संदर्भातील सर्व अधिकार हे अध्यक्ष शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात यांना संचालकाने दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड