महाबीज संचालकपदासाठी डॉ. रणजीत सपकाळ यांचे नामांकन दाखल
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.) । सामाजिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहणारे, मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारे डॉ. रणजीत सपकाळ यांना महाबीज संचालक म्हणून पुन्हा भागधारकांचा विश्वास मिळेल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर
Photo


अकोला, 19 जानेवारी (हिं.स.) । सामाजिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहणारे, मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारे डॉ. रणजीत सपकाळ यांना महाबीज संचालक म्हणून पुन्हा भागधारकांचा विश्वास मिळेल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.

सहकार, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे डॉ. रणजीत सपकाळ यांना भागधारकांचे भक्कम पाठबळ असल्याचे प्रतिपादन सहकार नेते डॉ. संतोष कोरपे यांनी केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या महाबीज संस्थेसाठी डॉ. रणजीत सपकाळ हे योग्य उमेदवार असल्याचे मत खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले. तर नानासाहेब हिंगणकर यांनीही भागधारक डॉ. सपकाळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी महाबीजची स्थापना करणारे स्वर्गीय मंत्री निळकंठ सपकाळ यांचे चिरंजीव असलेले डॉ. रणजीत सपकाळ यांनी महाबीज संचालक पदासाठी आपले नामांकन पत्र दाखल केले.

महाबीजमध्ये दर तीन वर्षांनी भागधारकांमधून संचालक पदाची निवडणूक होत असून, भागधारकांच्या भावना आणि अपेक्षित लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या डॉ. सपकाळ यांनी यावेळी पुन्हा उमेदवारी दाखल केली आहे.

नामांकन दाखल करताना खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर, सहकार नेते डॉ. संतोष कोरपे, माजी आमदार वसंतराव खोटरे, नानासाहेब हिंगणकर यांच्यासह राजकीय, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande