अकोल्यात मनपा आयुक्‍तांनी घेतला स्वच्छता विभागाचा आढावा
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍याव्‍दारे अकोला महानगरपाकेच्‍या डॉ.बाबासाहेब मुख्‍य सभागृह येथे अकोला महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन होणा-या स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त डॉ.लहाने या
Photo


अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍याव्‍दारे अकोला महानगरपाकेच्‍या डॉ.बाबासाहेब मुख्‍य सभागृह येथे अकोला महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन होणा-या स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी मनपा आयुक्त डॉ.लहाने यांनी, मनपा स्वच्छता विभागाव्दारे शहरात दैनंदिन होणा-या स्वच्छतेच्या कामाबाबत आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त यांनी कचरा घंटा गाडी बाबत नाराजी व्यक्त केली, तसेच सर्व स्वच्छता निरीक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत कचरा घंटा गाडी गेलीच पाहिजे याकडे विशेष लक्ष घालून नियोजनपुर्ण काम करणे, शहरातील कचरा संकलनाबाबत लावण्यात आलेले क्यू आर कोड स्कॅनिंग करणे, शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी नाल्यांचे साचलेले पणीही जबाबदार असल्याने शहरातील सर्व नालींचे सांडपाणी वाहता करणे, कचरा घंटा गाडी व्यतिरिक्त खुली जागा, नाली, नाले, व वस्तीच्या परिसरात कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व त्यांना कचरा घंटा गाडी मध्येच ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून फक्त कचरा घंटा गाडी मध्येच कचरा टाकणे संदर्भात प्रवृत्त करणे आदी सुचना दिल्या.

तसेच या कामांमध्ये कामचुकारपण केल्यास संबंधीत स्वच्छता निरीक्षकांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याबाबत यावेळी सांगिते.

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर यांचेसह सर्व स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande