
सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागले असून सोलापूर जिल्हा सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष बापू पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदासह राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
बापू पाटील हे यापूर्वी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे. त्यांच्या कौशल्यामुळेच बापू पाटील यांच्यावर सोशल मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वीच उमेश पाटील यांच्याकडचे कामकाज पाहणे बंद केल्याचे समजले. आता ते भारतीय जनता पार्टीकडे जॉईन झाल्याचे समजत असून त्यांनी आपल्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठवला आहे. ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीला राजीनामा दिल्याने हा एक प्रकारे धक्का मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड