
अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाचे दि. १५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. त्यानूसार अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने महानगरपालिका स्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती संदर्भिय क्र. २ अन्वये गठीत करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रानिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहीरातीचे पुर्वप्रमाणन, पेड न्युजसंदर्भातील तक्रारी/प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण, जनमत आणि मतदानोत्तर चाचणी, तसेच विविध प्रसारमाध्यमांतील वृत्तांकनाच्या संकेतांच्या पालनाबाबत संनियंत्रण आणि समाज माध्यमा संदर्भात देखरेख करण्याकरिता ९ ऑक्टोबर, २०२५ मधिल परिशिष्ट -२ नूसार अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहीरात प्रमाणन समितीचे गठन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे