
अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)।महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन 2026 निमित्त अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित अकोला पोलीस एकता चषक - बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2026 चे उद्घाटन आज (दि. 2 जाने.) सकाळी 8 वाजता उत्साहात पार पडले. स्पर्धेचे आयोजन मातोश्री बिग बॉक्स क्रिकेट टर्फ, खडकी समोर, शिवपुर फाटा, अकोला येथे करण्यात आले असून, परिसरात क्रीडारसिकांची उपस्थिती लक्षणीय होती. या स्पर्धेची संकल्पना अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांची असून, क्रीडेद्वारे विभागांतील समन्वय, आपसी संवाद आणि एकता अधिक बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी अर्चित चांडक (पोलीस अधीक्षक), सुनील लहाने (आयुक्त, मनपा अकोला), सुमन सोळंके (DFO), चंद्रकांत रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक), परी. सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.उद्घाटनानंतर मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधत शिस्त, टीमवर्क आणि क्रीडास्पर्धा वृत्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले. सदरच्या स्पर्धे करीता 11 हजार रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, सात हजार, मॅन ऑफ द सिरीज तीन हजार, मॅन ऑफ द मॅच दोन हजार बेस्ट बॅट्समन एक हजार., बेस्ट बॉलर एक हजार तसेच सहभागी खेडाळु यांना मेडल देण्यात येणार आहे, तसेच सदरच्या मॅचं चे लाईव्ह प्रसारण सुरु आहे.
तीन दिवस रंगणार स्पर्धा उत्सुकता शिगेलाही स्पर्धा 2, 3 आणि 4 जानेवारी 2026 दरम्यान पार पडणार असून, विविध विभागांमधील संघ एकमेकांशी मैत्रीपूर्ण वातावरणात भिडणार आहेत. खेळाडू, अधिकारी आणि नागरिक यांच्यात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सहभागी संघ विविधतेतून एकतेचा संदेश स्पर्धेत प्रशासन, पोलिस, आरोग्य, न्याय, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील संघांचा व्यापक सहभाग आहे.
ग्रुप - A, जिल्हाधिकारी संघ, अपर पोलीस अधिक्षक संघ, पोलीस प्रशिक्षण केंद्र संघ, शांतता समिती संघ, डॉक्टर संघ ग्रुप-B पोलीस अधीक्षक संघ पत्रकार संघ सामाजिक कार्यकर्ता संघ, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संघ व्यापारी संघ ग्रुप-८ एसपी अकोट संघ एसडीपीओ बाळापूर संघ महानगरपालिका संघ, अ डव्होकेट संघ शिक्षक संघ ग्रुप-D एसडीपीओ शहर संघ एसडीपीओ मुर्तीजापूर संघ इंजिनिअर संघ, महावितरण विभाग संघ वन विभाग संघ अशी विभागणी केली आहे. प्रत्येक सामन्यात खेळाडूंच्या कौशल्याबरोबरच खेळाडूपण आणि परस्पर आदर दिसून येत आहे.
क्रीडा जोडते प्रशासन मजबूत होते आयोजकांच्या मते, या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैली, क्रीडासंस्कार आणि परस्पर सहकार्य यांचा संदेश देणे हेच ध्येय आहे. नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास आणि जवळीक वाढावी, तसेच सर्व विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे, यासाठी ही स्पर्धा प्रभावी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले गेले. प्रेक्षकांची दाद कुटुंबांसह खेळाचा आनंद सुट्टीच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने कुटुंबांसह मैदानावर दाखल होत असून, मुलांसाठी आणि तरुणांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. उत्साहवर्धक घोषणा, टाळ्यांचा कडकडाट आणि खेळाडूंची चुरस, यामुळे मैदानावर सणासारखे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील सामने आणि अंतिम फेरीकडे लक्ष पुढील दोन दिवस लीग फेरीतील सामने खेळवले जाणार असून, शेवटच्या दिवशी उपांत्य आणि अंतिम सामना रंगणार आहे. विजेत्या संघाला एकता चषक प्रदान करण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सन्मान केला जाईल. अकोला जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत असून, क्रीडा आणि एकात्मतेचा सुंदर मेळ घालणारा हा उपक्रम आदर्श ठरतोय.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे