

मुंबई, २ जानेवारी (हिं.स.) : सार्या राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुढच्या पिढीतील दोन बंधू अर्थात आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये मुंबईतील उमेदवारांशी संवाद साधत मुंबईकरांसाठी विविध योजना, प्रकल्पांची संयुक्त घोषणा केली.
यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी, मनपा शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज, सुरक्षित पार्किंग, स्वयंरोजगार, कर प्रणाली, मोफत पाणी-वीज, १० रुपयांत जेवण, तरुणांसाठी सहाय्यता निधी, बेस्ट भाडे आदी सर्व समाजघटकांशी संबंधित घोषणांचा समावेश आहे.
यामध्ये, लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईकरांचा स्वाभिमान म्हणत घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार आहोत. कोळी महिलांसाठी सुद्धा हे आपण करणार आहोत. कोळी महिलांसाठी माँ साहेब किचनमधून 10 रुपयात नाश्ता आणि जेऋवण दिले जाणार आहे. महापालिकेच्या शाळामध्ये ज्युनिअर कॉलेज, सर्व बोर्डाच्या शाळा सुरू करणार, त्यात मराठी भाषा अनिवार्य असेल.
सुरक्षित पार्किंग - पार्किंगचा गंभीर विषय आहे. जिथे जिथे बीएमसीचे पार्किंग आहे तिथे मोफत पार्किंगसाठी आत्ता भाडे आकारणी केली जात आहेत.
स्वयंरोजगार - मुंबईत प्रत्येकाला नोकरी हवी आहे. त्यासाठी, एक लाख तरुण तरुणीना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहायता निधी देऊ
करप्रणाली - मुंबईकरांचे ओझे हलके करणार. आत्तापर्यत आपण 500 स्केअर फूटपर्यंत मालमत्ता कर माफ केला होता. मुंबईत पुन्हा आपली सत्ता आल्यास 700 स्केअर फूटपर्यतच्या घरांना मालमत्ता कर माफ करू.
पादचारी रस्ता - फुटपाथ आणि मोकळ्या जागा हव्यात. नागरिकांना फुटपाथ हा मिळालाचं पाहिजे. हे काम आम्ही हट्टाने करून घेणार
मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे. मुंबईत क्लायमेट ऍक्शन प्लॅन राबवायचा आहे.
पाणी-वीज मोफत - 100 युनिटपर्यत वीज मोफत करू, पूर्व आणि पश्चिम उपनगरात बेस्टकडून कशी वीज मिळेल याचा प्रयत्न करू. पाण्याचे दर सुद्धा स्थिर ठेवण्याचा काम करू.
युवा मुंबई, युवा मुंबईकर - प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू.
माज काढायचाय, घमंड तोडायचाय - अमित ठाकरे
अमित ठाकरे काय म्हणाले की, तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो, आदित्य तर आमदार आहे. नाशिकमध्ये तपोवनात त्यांचा मंत्री म्हणतो झाडं कापावीच लागणार, एवढा माज आहे. आपल्याला हा माज काढायचा आहे, घमंड तोडायचा आहे. आपण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाळणाघर सुरु करणार आहोत. सगळ्या लहान मुलांची काळजी यामध्ये घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शौचालय आपण सुरु करणार आहोत. याशिवाय, मुंबईत आणखी एक कॅन्सर रुग्णालय सुरु करायचं आहे. अर्ली डिटेक्शन ज्याने होईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे रुग्णालय सुरु करायचं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी