उत्तरप्रदेशातील बारावीपर्यंतच्या शाळा ५ जानेवारीपर्यंत बंद
वाढत्या थंडीमुळे घेण्यात आला निर्णय लखनऊ , 02 जानेवारी (हिं.स.)। उत्तर प्रदेशमध्ये वाढत्या तीव्र शीतलहरी आणि दाट धुक्यामुळे राज्यातील इयत्ता १२वीपर्यंतचे सर्व शाळा ५ जानेवारी २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री
वाढत्या थंडीमुळे उ. प्रदेशातील बारावीपर्यंतच्या शाळा ५ जानेवारीपर्यंत बंद


वाढत्या थंडीमुळे घेण्यात आला निर्णय

लखनऊ , 02 जानेवारी (हिं.स.)। उत्तर प्रदेशमध्ये वाढत्या तीव्र शीतलहरी आणि दाट धुक्यामुळे राज्यातील इयत्ता १२वीपर्यंतचे सर्व शाळा ५ जानेवारी २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत. हा आदेश आयसीएसई, सीबीएसई, यूपी बोर्डसह सर्व मान्यताप्राप्त सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांना लागू राहणार आहे.

थंडीची तीव्रता लक्षात घेता इयत्ता १२वीपर्यंतच्या सर्व शाळा ५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुलांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.दरम्यान, भीषण थंडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी यांनी अधिकाऱ्यांना क्षेत्रात प्रत्यक्ष तपासणी (फिल्ड इन्स्पेक्शन) करत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गरजू लोकांना पुरेशा प्रमाणात ब्लँकेट्स उपलब्ध करून देणे, कोणालाही उघड्यावर झोपू देऊ नये आणि सर्व रात्रीच्या निवाऱ्यांमध्ये आवश्यक त्या सुविधा पूर्णपणे उपलब्ध ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

शीतलहरीच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात दौरे करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. थंडीच्या प्रकोपापासून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि असहाय लोकांचे संरक्षण हे प्राधान्य मानून तातडीच्या मदत व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.उत्तर प्रदेशच्या बहुतांश जिल्ह्यांत सध्या कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा कहर सुरू आहे. काही जिल्ह्यांत तब्बल १० दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले असून त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र दाट धुक्यामुळे राज्यात अनेक अपघातही घडल्याची माहिती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande