अकोला : रेल्वे पोलिसांच्या कारवाईत गांजा जप्त!
अकोला, 20 जानेवारी (हिं.स.)।रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गांजा जप्त करीत एकाला अटक केली आहे.. रेल्वे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अ
Photo


अकोला, 20 जानेवारी (हिं.स.)।रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गांजा जप्त करीत एकाला अटक केली आहे.. रेल्वे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे..

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला रेल्वे स्टेशन परिसरात एक जण गांजाची वाहतूक करत असल्याबाबत मिळालेल्या माहीतीवरून रेल्वे पोलीसांनी एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत कारवाई करत अकोला रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील बुकिंग परिसरातून आरोपी नामे गणेश बाळू आंभोरे, वय २५ वर्षे, रा. अब्दुल हमीद चौक, संजय नगर, नायगाव, अकोला याच्या ताब्यातून 1 बंडल, त्यात ओलसर फुल/बिया/काडीदार हिरवटसर रंगाचा, एकूण १ किलो ८८७ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा किंमत २८,३०५/- रूपये चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपीने अंमली पदार्थ स्वतःजवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्याच्याविरूध्द लोहमार्ग पोलीस स्टेशन, अकोला येथे दाखल गुन्हा करण्यात आला असून सदर गांजा कोठून आणला? कोठे घेवून जाणार होता? याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande