जळगाव : कुंटणखान्यावर धाड
जळगाव, 20 जानेवारी (हिं.स.) : जळगावमध्ये आणखी एका देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. डीवायएसपी यांच्या पथकाने जळगावच्या पिंप्राळ्यात बारीवाड्यातील एका घरात सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पश्चिम बंगालच्या २८
जळगाव : कुंटणखान्यावर धाड


जळगाव, 20 जानेवारी (हिं.स.) : जळगावमध्ये आणखी एका देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. डीवायएसपी यांच्या पथकाने जळगावच्या पिंप्राळ्यात बारीवाड्यातील एका घरात सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीसह चार महिलांची सुटका केली. तर संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून रामानंदनगर पोलिसात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पिंप्राळा भागात एका ठिकाणी छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यावरुन बारीवाडालगत बैरागी नामक महिलेच्या घरात पोलिसांनी १५०० रुपये देऊन एका पंटरला ग्राहक म्हणून पाठवले. त्याला खात्री करून मोबाइलवर मिस कॉल देण्यास सांगण्यात आले.त्याप्रमाणे मिस कॉल येताच पथक व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह व चार महिला आढळल्या. छापा टाकत असताना घराला असलेल्या तीन दरवाजांचा फायदा घेऊन एक ग्राहक पळून गेला. पोलिसांनी या ठिकाणाहून पश्चिम बंगालची २८ वर्षीय तरुणी, सुरत येथील ३० वर्षीय महिला व जळगावातील ३५ वर्षीय दोन महिलांची सुटका केली. तसेच या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande