
छत्रपती संभाजीनगर, 21 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील
भाजपाच्या ५७ विजयी नगरसेवकांसह छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीची महाआरती करण्यात आली
शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणतेही कार्य आरंभताना श्री संस्थान गणपती चरणी नतमस्तक होण्याची परंपरा आम्ही कायम जपली आहे आणि प्रत्येक वेळी त्यास यशाची जोड मिळाली आहे.
यासंदर्भात बोलताना दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की,
छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने भाजपावर विश्वास ठेवत ५७ नगरसेवक निवडून दिले. या ऐतिहासिक विजयाने महानगराच्या विकासाला नवा वेग मिळणार आहे. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गणरायाच्या चरणी एकजुटीने साकडे घालून उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
भाजपातर्फे मध्यवर्ती कार्यालयात सर्व विजयी नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर कार्यालयापासून श्री संस्थान गणपतीपर्यंत निघालेली नगरसेवकांची दुचाकी रॅली विशेष लक्षवेधी ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis