
रत्नागिरी, 21 जानेवारी, (हिं. स.) : येथील शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निबंध लिहिण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता- शिक्षण प्रणालीतील फायदे तोटे' हा विषय आहे. किमान ७०० शब्दांची शब्दमर्यादा आहे. स्पर्धा डीएड व बीएड छात्राध्यापक व शिक्षक तसेच खुला गट या दोन गटांत घेण्यात येणार आहे. निबंध मराठी भाषेतूनच असावा. निबंध कागदाच्या एकाच बाजूला स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा. प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत.निबंधाबरोबर स्पर्धकाने स्वतःचे नाव गट क्रमांक, पत्ता मोबाइल नंबर लिहिलेला स्वतंत्र कागद जोडावयाचा आहे. निबंध ३१ जानेवारीपर्यत शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, ४९० दुर्वांकुर, स्वरुपानंद वसाहत, गयाळवाडी मु. पो. खेडशी, ता. जि. रत्नागिरी ४१५६३९ या पत्त्यावर पाठवावा.विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल. स्पर्धा निकाल व पारितोषिक वितरणाची तारीख वेळ नंतर कळविण्यात येईल. जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा समिती प्रमुख विनायक हातखंबकर व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी