परभणी - संक्रांतिनिमित्त महिलांना ‘विचारांचे वाण’
परभणी, 21 जानेवारी, (हिं.स.)। मोबाईल व इंटरनेटच्या युगात वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने जिजाऊ ब्रिगेड परभणीच्या वतीने संक्रांतिनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात पुस्तकांचे वाण देत ‘विचारांचे वाण’ दिले गेले. हा कार्यक्रम व
परभणी - संक्रांतिनिमित्त महिलांना ‘विचारांचे वाण’


परभणी, 21 जानेवारी, (हिं.स.)। मोबाईल व इंटरनेटच्या युगात वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने जिजाऊ ब्रिगेड परभणीच्या वतीने संक्रांतिनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात पुस्तकांचे वाण देत ‘विचारांचे वाण’ दिले गेले.

हा कार्यक्रम वसमत रोडवरील आचार्य कॉलनी येथे उत्साहात पार पडला. यावेळी सौ. कविता चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ. कांचन कारेगावकर, सौ. सुनीता यादव, सौ. विजयश्री मांडगे, सौ. निर्मला सूर्यवंशी, सौ. अनुराधा वायकोस, सौ. ललिता यादव व सौ. सुनीता जाधव यांनी ‘विचारांचे वाण’ हा उपक्रम यशस्वीपणे राबवला.

या कार्यक्रमात उपस्थित शेकडो महिलांना गौतम बुद्ध, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भगतसिंग, गाडगेबाबा आदी थोर महापुरुषांच्या विचारांवर आधारित ग्रंथ भेट देत संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande