शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे केडीएमसी गटनेतेपदी निवड
डोंबिवली, 21 जानेवारी (हिं.स.)। शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. प्रदीर्घ अनुभव आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेल्या विश्वनाथ राणे यांच्याकडे आता
Photo 1


डोंबिवली, 21 जानेवारी (हिं.स.)।

शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. प्रदीर्घ अनुभव आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेल्या विश्वनाथ राणे यांच्याकडे आता महापालिकेतील शिवसेनेची नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे केडीएमसीतील शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावी होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande