
रायगड, 21 जानेवारी (हिं.स.)।
अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत वरसोली पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या (शिंदे गट) रणरागिणी प्रियांका संदेश गुंजाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे दाखल केला. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झालेल्या भरीव विकासकामांच्या जोरावर तसेच मतदारांशी असलेल्या दृढ संपर्काच्या आधारे आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास प्रियांका गुंजाळ यांनी व्यक्त केला.
अलिबाग पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी असून २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
वरसोली मतदारसंघावर शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आमदार महेंद्र दळवी यांचे प्रियांका गुंजाळ व संदेश गुंजाळ हे कट्टर समर्थक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंजाळ दाम्पत्याने मतदारसंघात विविध विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. या विकासकामांचा थेट लाभ नागरिकांना झाल्याने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचेही बोलले जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रियांका गुंजाळ यांच्यासोबत आमदार महेंद्र शेठ दळवी तसेच जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके