
डोंबिवली, २१ जानेवारी (हिं.स.) - येथे पालावा सिटीतील लेकसाइड पार्क येथे नुकताच भव्य पालावा कार्निव्हल २०२६ साजरा करण्यात आला. यावेळी संकुलातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निमित्ताने वार्षिक सामुदायिक महोत्सवामध्ये रंगतदार सादरीकरणे, संवादात्मक उपक्रम, विविध खाद्य अनुभव तसेच पालावाज् गॉट टॅलेंट आणि मिस्टर अॅण्ड मिसेस पालावा या स्पर्धांचा भव्य अंतिम सोहळा पार पडला. लोकप्रिय गायिका निखिता गांधी हिने आपल्या बँडसह सादर केलेला लाईव्ह परफॉर्मन्स विशेष आकर्षण ठरला. ज्याने संपूर्ण टाउनशिपमधून उत्साही प्रेक्षकांची मोठी गर्दी केली होती. सामुदायिक जीवनाचा उत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या पालावा कार्निव्हलने सर्व वयोगटांतील लोकांना संगीत, संस्कृती आणि एकत्वाची भावना भारतातील एक मोठ्या उत्साही आणि परस्परांशी जोडलेल्या समुदायांपैकी एक उभारण्याच्या पालावाच्या दृष्टीकोनाला अधिक बळ दिल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी