
मुंबई, 21 जानेवारी (हिं.स.) - भगवा आंतकवाद सिद्ध करण्यासाठी पुरोगाम्यांनी जी फेक नेरेटिव्हची साखळी रचली होती, त्यातीलच कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील समीर गायकवाड यांची अटक होती. समीर गायकवाड यांच्या निधनामुळे त्यांना या खटल्यात कशा प्रकारे गोवण्यात आले हे सिद्ध करण्याची संधी हुकली, अशी खंत या खटल्यातील समीर गायकवाड यांचे अधिवक्ता आणि हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘पानसरे खटल्यामध्ये २ जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली तेव्हापासून समीर गायकवाड याचा आत्मविश्वास प्रचंड खचला होता. जामीन खूप उशिरा मिळणे, त्यानंतर सरकारने पुन्हा उच्च न्यायालयत जाणे, खटला उशिरा चालू होणे या प्रकारांमुळे तो दु:खी होता. या सर्व काळात ‘कॉ. पासनसरे हत्या प्रकरणातील आरोपी’ म्हणून अपकीर्ती आणि संघर्ष त्याच्या नशिबी आला. या खटल्यामुळे त्याला कुणी काम देईना. कॉ. पानसरे हत्याकांडातील आरोपी म्हणून त्यांची जी हेटाळणी झाली ती अतिशय वाईट आहे.‘‘
व्यवस्थेच्या खच्चीकरणाच बळी असल्याचे जाणवते !
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘कॉ. पानसरे हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना जेव्हा जन्मठेपीची शिक्षा झाली तेव्हा समीर याने मला ‘त्यांना शिक्षा का झाली ?’ असे विचारले. त्या वेळी ‘त्यांना खरे सोडायला हवे होते. उच्च किंवा सर्वाेच्च न्यायालयात ते निश्चित निर्दाेष सुटतील; परंतु त्याला किती वर्षे लागतील ? हे सांगता येत नाही’, असे मी त्याला म्हटले होते. त्या वेळी चालू असलेल्या ‘मिडिया ट्रायल’मुळे त्याचा पडलेला तोंडावळा मला आजही आठवतो. ‘कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणात मी निर्दाेष असूनही मला शिक्षा होईल का ?’, असे समीर याने मला विचारले होते. यावरून कुठेतरी व्यवस्थेकडून होणार्या खच्चीकरणाचा हा बळी असल्याचे मला जाणवले.
...याविषयी कुणी संवेदना व्यक्त करणार की नाही ?
वर्ष २००८ मध्ये मालेगाव बाँम्बस्फोट ज्या प्रकारे स्वाधी प्रज्ञासिहं यांना न्यायालयात आणण्यात आले ते पाहून न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या साहू नावाच्या त्यांच्या भक्ताचा भर न्यायालयात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला; परंतु त्याची बातमीही कुठे प्रसिद्ध झाली नाही. कोरेगाव-भीमा दंगलीच्या प्रकरणातील आरोपी स्टॅम्प स्वामी यांचे निधन झाले, तेव्हा उच्च न्यायालयासह संयुक्त राष्ट्र संघानेही शोक व्यक्त केला. समीर गायकवाड यांच्या निधनाची संवेदनापर्यंत कुणापर्यंत पोचेल का ? समीर मराठा होता म्हणून जरांगे पाटील काही बोलतील का ? ही एक अधिवक्ता म्हणूनही आणि एक सामान्य नागरिक म्हणूनही माझी व्यथा आहे, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी