
लातूर, 25 जानेवारी (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून औसा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कट्टर शिवसैनिक दिनकर माने हे उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिनकर माने हे दीर्घकाळ शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले असून औसा मतदारसंघात त्यांचा मजबूत जनाधार आहे. त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच कट्टर शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे.
उद्या मुंबईत होणाऱ्या भाजप प्रवेश कार्यक्रमासाठी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह लातूर जिल्ह्यातून मुंबईकडे कूच करण्यात येणार आहे. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis