
लातूर, 25 जानेवारी (हिं.स.)।
नळेगाव जिल्हा परिषद गट व
पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या
उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आमदार अमित देशमुख
यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.या प्रसंगी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष
माजीमंत्री विनायकराव पाटील उपस्थित होते
सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा प्रचार केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, जनतेच्या विश्वासावर उभा असलेला जनसेवेचा दृढ संकल्प आहे. शेतकरी, कामगार, युवक, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना न्याय देत विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे आणि या निर्धाराप्रती आम्ही कटिबद्ध आहोत असा दोन्ही नेत्यांनी विश्वास याप्रसंगी उपस्थितांना दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis