
लातूर, 25 जानेवारी (हिं.स.)।
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप व रिपाई (आठवले) महायुतीच्या वतीने रोकडा सावरगाव सर्कल येथे २५ जानेवारी रोजी प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या प्रचार सभेचा शुभारंभ करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडणुकीत जिल्हा परिषद रोकडा सावरगाव सर्कल सदस्य पदासाठी उमेदवार अश्विन धोंडीराम नागराळे, पंचायत समिती गण रोकडा सावरगाव सदस्य पदासाठी देवेंद्र भालचंद्र जाधव तसेच पंचायत समिती गण काजळ हिप्परगा सदस्य पदासाठी कमल माधवराव सरवदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या तिन्ही उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब आबा पाटील (टाकळगाव) होते. प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव केंद्रे (माजी जि. प. सदस्य), दिलीपराजी देशमुख, बाबासाहेब कांबळे (जिल्हाध्यक्ष, रिपाई), त्र्यंबक आबा गुट्टे (माजी जि. प. सदस्य), शिवानंद तात्या हेंगणे (प्रदेश सरचिटणीस), शिवाजीराव देशमुख (तालुका अध्यक्ष अहमदपूर), राम बेल्लाळे (भाजप), तुकाराम पाटील, नारायणराव देशमुख, कमलाकर देशमुख, युवराज घोगरे, प्रदीप जाधव, प्रवीण रेड्डी (सरपंच, काजळ हिप्परगा), श्रीकांत बनसोडे, नामदेव विराळे, सुनील वाहुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सर्कल रोकडा सावरगाव मधील गावकरी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis