
लातूर, 25 जानेवारी (हिं.स.)।
दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होणार असल्यामुळे अहमदपूर नगर परिषदेने शहरातील आठवडी बाजाराच्या नियोजनात महत्त्वाचा बदल केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर होणारे शासकीय ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम विचारात घेऊन, सोमवारी भरणारा नियमित आठवडी बाजार या दिवशी न भरवता तो मंगळवारी, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी भरवण्याचा निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आहे. हा बदल केवळ या आठवड्यापुरता मर्यादित असून, पुढील सोमवारपासून आठवडी बाजार पुन्हा नेहमीप्रमाणे ठरलेल्या वाराप्रमाणेच भरवला जाईल याची सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रेते, ग्राहक आणि बाजार करवसुली ठेकेदारांनी नोंद घ्यावी. तरी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रशासनाने केलेल्या या बदलाची नागरिकांनी दखल घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद अहमदपूर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis