


रायगड, 26 जानेवारी (हिं.स.)।
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी नेरळ परिसरात विविध शासकीय व सार्वजनिक ठिकाणी देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नेरळ पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस अधिकारी राहुल वरुते यांच्या हस्ते सकाळी 7.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
याचबरोबर नेरळ ग्रामपंचायत सकाळी ८ वाताजा , चावढी नाका येथे तसेच तलाठी कार्यालय येथे सकाळी ८.३० वाजतप्रशासक अधिकारी सुजित रेखा मधुकर धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला. देशाच्या स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये व संविधानाचे महत्त्व यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आकर्षक ड्रिल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिस्त, एकात्मता व राष्ट्रप्रेम याचे दर्शन घडवणारी ही ड्रिल विशेष लक्षवेधी ठरली.
कार्यक्रमास आजी-माजी सरपंच, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांसाठी चहा व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण परिसर “वंदे मातरम्” व “भारत माता की जय”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमामुळे नेरळ परिसरात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके