
लातूर, 26 जानेवारी (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरु असलेल्या चौफेर विकास कार्याने प्रभावित होऊन, औसा विधानसभा मतदारसंघाचे 10 वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार श्री दिनकरराव माने यांनी आज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख श्री आबासाहेब पवार, तालुका संघटक श्री श्रीराम पवार यांच्यासह अनेक आजी/माजी सरपंच, चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांचेही सहर्ष स्वागत. लातूर जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती तथा मातोळा गावचे काँग्रेस पदाधिकारी श्री अमरसिंह भोसले यांनीही त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांचेही सहर्ष स्वागत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis