
नांदेड, 26 जानेवारी (हिं.स.)। प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वानिमित्त नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर देशभक्ती, शिस्त आणि संविधाननिष्ठेचे भव्य दर्शन घडले. पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडलेला ध्वजवंदन सोहळा उत्साह आणि अभिमानाने भारलेला होता. परेडमधून पोलीस दल, श्वान पथक, अग्निशामक दल व विविध नागरी सेवा यंत्रणांच्या कार्यक्षमतेचे प्रभावी दर्शन घडले. राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवेत असलेल्या सर्व जवानांना अतुल सावे यांनी मानाचा सलाम केला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, दिव्यांग बंधू-भगिनी व कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान करून समाजातील प्रेरणादायी शक्तींना व्यासपीठ मिळाले. संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवत, समर्पण आणि सेवाभावातून नांदेडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis