
अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.)।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंजचे सचिव जनार्दन बोथे गुरुजी यांना जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. समाजसेवेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल हा पुरस्कार सर्व अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विविध पथकांनी शिस्तबद्ध परेड संचलन केले. या प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा ‘बालविवाहमुक्त’ करण्यासाठी उपस्थितांना सामूहिक शपथ देण्यात आली. कार्यक्रमास विविध मान्यवर, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी