मालेगावमध्ये फुगे भरणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटात सहा जखमी
मालेगाव, 26 जानेवारी (हिं.स.) शहरातील कॉलेज स्टॉप वरती फुगे भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन सहा जण जखमी झाले आहे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अचानक स्फोट झाल्यामुळे काही काळ शहरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती तातडीने पोलीस घटनास्थळी
मालेगावमध्ये फुगे भरणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटात सहा जखमी


मालेगाव, 26 जानेवारी (हिं.स.) शहरातील कॉलेज स्टॉप वरती फुगे भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन सहा जण जखमी झाले आहे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अचानक स्फोट झाल्यामुळे काही काळ शहरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण आणले कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे अहवाल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की मालेगाव शहरातील कॉलेज स्टॉप या ठिकाणी एक फुगे विक्रेता फुगे भरत होता अचानकपणे त्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि मोठा आवाज झाल्याने एकच खळबळ उडाली प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची सर्वत्र गडबड सुरू असताना हा स्फोट झाला त्यामुळे मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाल्याची चर्चा जोर धरू लागली तातडीने घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत या स्फोटामध्ये सर्वसाधारण आठ व्यक्ती या जखमी झाल्या होत्या त्यांना जवळील प्रयास रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे यातील काही जणांना मामुली जखमा झालेल्या होत्या त्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. यानंतर पोलिसांनी नागरिकांना कोणताही स्फोट झालेला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande