
बीड, 26 जानेवारी (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे २८ जानेवारी ते ३० जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्याभरात १० वेगवेगळ्या केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नाट्य स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis