

बीड, 26 जानेवारी (हिं.स.)।भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन बीड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. आज पोलिस मुख्यालय, कवायत मैदान, नगर रोड, बीड येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर बाबासाहेब पाटील यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या एकता, अखंडता व संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.त्याचप्रमाणे बीड शहर आणि परिसरात विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ संपन्न झाले.आज बीड नगर परिषद येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या मंगल प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपाध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक आणि सर्व सहकारी, न.प.कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis