मोटारसायकलला कट मारल्याचा बहाणा करून लुटमार करणारी टोळी ताब्यात
लातूर, 27 जानेवारी, (हिं.स.)। लातूर शहरात घडणाऱ्या जबरी चोरी व लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी विविध पोलीस ठाण्यात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन संबंधित प्रभारी अधिकारी व गुन
लातूर पोलीस


लातूर, 27 जानेवारी, (हिं.स.)। लातूर शहरात घडणाऱ्या जबरी चोरी व लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी विविध पोलीस ठाण्यात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन संबंधित प्रभारी अधिकारी व गुन्हे अन्वेषण पथकाला सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत तत्परता, कौशल्य व दक्षतेने कारवाई करून एका सराईत आरोपीस अटक केली असून त्याच्यासोबत असलेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ₹ ४,६६,५५०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून शहरात सक्रिय असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर हद्दीतील गरुड चौक, नांदेड रोड, लातूर येथे दिनांक २४/०१/२०२६ रोजी एक इसम मोटारसायकलवरून जात असताना विना नंबर प्लेट असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्याच्या वाहनास मुद्दाम कट मारला. “तुमच्यामुळे आमचा मोबाईल फुटला आहे” असा बनाव करून त्यांनी फिर्यादीची मोटारसायकल आडवली. त्यानंतर त्याला धमकावून, दहशत निर्माण करून त्याच्या हातातील अंदाजे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व ते तिघेही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.या घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे येऊन घडलेली घटना सांगितली. त्यावरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४५/२०२६ अन्वये कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी केलेल्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्वरित तपास सुरू केला. घटनास्थळी मिळालेली माहिती, फिर्यादीने दिलेले वर्णन तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, संशयास्पदरीत्या फिरणारी विना नंबर प्लेट स्प्लेंडर मोटारसायकल पोलिसांच्या निदर्शनास आली. सदर मोटारसायकल अडवून तिच्यावर असलेल्या तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुख्य आरोपी नामे

1) वसीम रज्जाक शेख, वय २६ वर्षे, रा. सिंदगाव, ता. रेणापूर, जि. लातूर.

याने त्याच्यासोबतच्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या मदतीने शहरातील विविध भागांत अशाच पद्धतीने जबरी चोरी व लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, सदर आरोपी व टोळीविरुद्ध

१)पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर गु.र.नं. ४६/२०२६ कलम ३०३(२), ३(५) BNS.

२) पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर गु.र.नं. ४८/२०२६ कलम ३०३(२), ३(५) BNS.

३)एमआयडीसी, लातूर गु.र.नं. ३२/२०२६ कलम ३०३(२), ३(५) BNS.

४)पोलीस ठाणे शिवाजीनगर, लातूर

गु.र.नं. ४०/२०२६ कलम ३०३(२), ३५१, ३(५) BNS.

प्रमाणे गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींनी मोटारसायकलला कट मारणे, खोटा बहाणा करणे, नागरिकांना धमकावणे व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेणे अशीच पद्धत अवलंबिल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर कारवाईत मुख्य आरोपी वसीम रज्जाक शेख यास अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून वरील गुन्ह्यांतील गेला माल – एकूण ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹ ४,६६,५५०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुख्य आरोपी वसीम रज्जाक शेख याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी, लुटमार व तत्सम स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, यांचे सूचना व आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, चे पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खोडेवाड, श्री. मुळे, पोलीस उपनिरीक्षक रेडेकर,सफौ. गुंडरे,पोलीस अंमलदार ,खुर्रम काझी, रविंद्र गोंदकर, यशपाल कांबळे, गणेश यादव, रणवीर देशमुख, धैर्यशील मुळे, सचिन राठोड, प्रेमानंद कांबळे, खंडू कोळी यांनी अत्यंत शिस्तबद्ध, धाडसी व कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande