महावितरणच्या अभियंत्याला ३५ हजारांची लाच घेतांना अटक
अमरावती, 29 जानेवारी (हिं.स.)। अंजनगाव सुर्जी येथील महावितरण कंपनीच्या अभियंत्याने सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या आरोपांत अडकवून लुटणाऱ्या महावितरण चा भ्रष्ट कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.अंजनगाव सुर्जी येथील महावितरण क
महावितरण अभियंता ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक


अमरावती, 29 जानेवारी (हिं.स.)। अंजनगाव सुर्जी येथील महावितरण कंपनीच्या अभियंत्याने सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या आरोपांत अडकवून लुटणाऱ्या महावितरण चा भ्रष्ट कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.अंजनगाव सुर्जी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता अजय विलास चौधरी (वय ३३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती यांनी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून गजाआड केले आहे.ही कारवाई दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार,आरोपी अभियंत्याने आपल्या विज वितरण कार्यालयातील कर्मचारांना सोबत घेऊन तक्रारदाराच्या घरातील वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरीचा बनावट आरोप केला. गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत “प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्या”अशी सरळ सरळ धमकी देण्यात आली. सुरुवातीला ४५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून, तडजोडीनंतर ३५ हजार रुपये लाच घेण्यावर सौदा ठरवण्यात आला. अभियंत्याच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि महावितरण कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताच आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली.आरोपीकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे की, शासकीय कामासाठी कोणतीही लाच मागणारा अधिकारी किंवा कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande