
नाशिक, 28 जानेवारी (हिं.स.)। मनमाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल व्हॉट्सॲप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. मनमाड शहर पोलीस ठाण्यात 28 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी ही तक्रार दाखल करण्यात आली असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरुकुमार निकाळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेकी मनमाड शहरातील लोकलढा न्याय न्यूज या ग्रुपवर गणेश कुनगर राहणार धोटाने बुद्रुक याने अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल घोटाळे करणारे असेच मेले पाहिजे अशी आक्षेपार्ह व भावना दुखावणारी पोस्ट केली होती यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त होऊन शहर पोलिस ठाण्यात गेले व पोलीस निरीक्षक विजय करे यांची भेट घेऊन आशा माथेफिरूवर कारवाई करण्याची मागणी केली पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन गुन्हा दाखल करून घेतला व आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पाठवले मात्र गणेश कुनगर हा मोबाईल बंद करून पळून गेला होता पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अनेक राजकीय नेत्यांची मध्यस्ती
गणेश कुनगर याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली व त्यांनतर मोबाईल बंद करून पळून गेला याबाबत त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावली होती याशिवाय त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली यामुळे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.
नेमके काय घडले?
तक्रारदार गुरुकुमार निकाळे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गणेश कुनगर यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो शेअर केला. त्याखाली 'देशात भ्रष्टाचार करणारे नेते असेच मेले पाहिजे' आणि '70 हजार कोटी घेऊन गेले' अशा आशयाची पोस्ट टाकून पवारांची बदनामी केली. यामुळे तक्रारदाराचे व पक्षाचे मोठे अब्रुनुकसान झाले यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV