अजितदादा राष्ट्रवादीला पोरकं करून गेले - विक्रम काळे
लातूर, 28 जानेवारी (हिं.स.)। अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला पोरकं करून गेले, ही भावना आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात खोलवर रुजलेली आहे. काही दिवसांपूर्वी लातूर महानगरपालिका प्रचारासाठी ते आले होते. त्यांच्या आगमनाआधी मी तेथे पोहोचलो होतो. त
अजित पवार

लातूर, 28 जानेवारी (हिं.स.)।

अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला पोरकं करून गेले, ही भावना आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात खोलवर रुजलेली आहे.

काही दिवसांपूर्वी लातूर महानगरपालिका प्रचारासाठी ते आले होते. त्यांच्या आगमनाआधी मी तेथे पोहोचलो होतो. त्यांना आणण्यासाठी माझी गाडी पाठवली होती आणि त्यांच्या येण्याआधी सभास्थळावरील संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे होती. कार्यक्रमाच्या धावपळीत, घाईगडबडीतही गाडी पाठवल्याबद्दल त्यांनी मुद्दाम धन्यवाद मानले. अशा लहानसहान गोष्टी लक्षात ठेवून माणुसकीने वागणं, हीच अजितदादांची खरी ओळख होती.

‘विक्रम माझा सर्वात लाडका आमदार आहे,’ असं ते अनेकदा सर्वांसमोर सांगायचे. कधी कधी माझ्यावर रागवायचे, पण तो रागही आपुलकीचाच असायचा. मी माझा मुद्दा ठामपणे मांडायचो आणि दादाही तेवढ्याच ठामपणे ऐकून घ्यायचे. पक्षाच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाची मांडणी असली, की ‘विक्रमला सहभागी करून घ्या,’ असे ते आवर्जून सांगायचे. त्या विश्वासानेच मला नेहमी ताकद दिली. मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा गाडी घेतली होती. तीच गाडी घेऊन मी दादांना बारामतीला भेटायला गेलो होतो. पूजेनंतर त्यांनी मला बाजूला बसवले आणि स्वतः गाडी चालवत संपूर्ण बारामती फिरवून दाखवली. त्या प्रवासात केवळ रस्तेच नाही, तर राजकारण, प्रशासन आणि जनतेशी नातं कसं जपायचं याचंही जिवंत दर्शन घडवलं. अशा असंख्य आठवणी आज मनात गर्दी करून उभ्या राहिल्या आहेत. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड आणि वचक होता. पण त्याच वेळी सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन चालणं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने पक्षाची, राज्याची आणि सर्वसामान्य जनतेची मोठी हानी झाली आहे, हे मान्य करावंच लागेल.

मराठवाड्यातील शिक्षक बांधवांच्या वतीने, तसेच माझ्या वैयक्तिक भावनांतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

 rajesh pande