
अमरावती, 29 जानेवारी (हिं.स.) ।महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी २० जानेवारी रोजी संगणक विभागामार्फत फेस ऍप प्रणाली द्वारे कर्मचाऱ्यांचे उपस्थितीचा आढावा घेतला असता, त्यांना ३२५ अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेमध्ये फेस ऍप द्वारे त्यांचे उपस्थितीची नोंद केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना विना वेतन का करण्यात येवू नये अशी नोटीस देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक नियम १९७९ च्या नियम ३ मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमीच कर्तव्यपारायणता ठेऊन अशोभनीय ठरेल अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. शासनाचे निर्देशानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सकाळी ०९.३०वाजता आणि इतर अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात उपस्थित राहून आधार प्रणाली अंतर्गत फेस ऍप द्वारे उपस्थितीचे प्रमाणीकरण करुन दैनंदिन हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे हा त्यांचे कर्तव्याचा भाग आहे. याबाबत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेवेळी सुचित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेतील कार्यरत सर्व कर्मचारी त्यांचे कार्यालयात वेळेवर उपस्थित राहुन कामकाज करतात किंवा नाही याबाबत मा. आयुक्त महोदया सौम्या शर्मा-चांडक यांनी मंगळवारी २० जानेवारी रोजी संगणक विभागामार्फत फेस ऍप प्रणाली द्वारे कर्मचाऱ्यांचे उपस्थितीचा आढावा घेतला असता त्यांना ३२५ अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेमध्ये फेस ऍप द्वारे त्यांचे उपस्थितीची नोंद केली नसल्याचे आयुक्तांचे निदर्शनास आले. आयुक्तांनी त्वरीत संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचे मंगळवार २० जानेवारी रोजीची अनाधिकृत गैरहजेरी विनावेतन का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे सामान्य प्रशासन विभागास आदेशित केले. त्यास अनुसरुन सामान्य प्रशासन विभागामार्फत संबंधित कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी