लातूरमध्ये रंगणार भक्तीचा सोहळा! साईसेवक प्रतिष्ठानचा ४०वा भव्य 'साईबाबा भंडारा उत्सव'
लातूर, 29 जानेवारी (हिं.स.)। भक्ती, शक्ती आणि सेवेचा त्रिवेणी संगम असलेल्या लातूरच्या साईसेवक प्रतिष्ठान (कव्हा नाका) वतीने यावर्षीही मोठ्या उत्साहात सार्वजनिक साईबाबा भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या उत्सवाचे हे ४० वे देदीप
भक्तीचा सोहळा


लातूर, 29 जानेवारी (हिं.स.)।

भक्ती, शक्ती आणि सेवेचा त्रिवेणी संगम असलेल्या लातूरच्या साईसेवक प्रतिष्ठान (कव्हा नाका) वतीने यावर्षीही मोठ्या उत्साहात सार्वजनिक साईबाबा भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या उत्सवाचे हे ४० वे देदीप्यमान वर्ष असून परमपूज्य विद्यानंदजी महाराज (बाबा) गातेगावकर यांच्या दिव्य उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

​उत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक:

​स्थळ: राजीव नगर, कव्हा, ता. जि. लातूर.

​१) शनिवार, ३१ जानेवारी २०२६

​भजन संध्या: सायंकाळी ७:०० ते रात्री १०:०० (सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम)

​२) रविवार, ०१ फेब्रुवारी २०२६

​अभिषेक व महापूजा: सकाळी ७:०० ते ८:००

​भव्य कीर्तन सोहळा: सकाळी १०:०० वाजता

​कीर्तनकार: महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार प.पू. विद्यानंदजी महाराज (बाबा) गातेगावकर

​महाप्रसाद (भंडारा): कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप.

​नम्र आवाहन...

​कव्हा गाव आणि परिसरातील सर्व साईभक्तांनी, भाविकांनी या भक्ती सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

​आयोजक:

साईसेवक प्रतिष्ठान, कव्हा नाका, लातूर व समस्त ग्रामस्थ कव्हा.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande