अजय पाटील यांच्या ART FX अकादमीचे पनवेलमध्ये दिमाखदार उद्घाटन
रायगड, 29 जानेवारी (हिं.स.)। वासेनेच्या माध्यमातून तरुणांना नव्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आर्ट एफएक्स स्कूल ऑफ ॲनिमेशन या अकादमीचे जंगी उद्घाटन पनवेल येथे उत्साहात पार पडले. उद्योजक युवासेना पनवेलचे युवा अधिकारी अजय पाट
Ajay Patil's ART FX Academy inaugurated in Panvel


रायगड, 29 जानेवारी (हिं.स.)।

वासेनेच्या माध्यमातून तरुणांना नव्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आर्ट एफएक्स स्कूल ऑफ ॲनिमेशन या अकादमीचे जंगी उद्घाटन पनवेल येथे उत्साहात पार पडले. उद्योजक युवासेना पनवेलचे युवा अधिकारी अजय पाटील यांच्या या नव्या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते, राज्य संघटक व व्यावसायिक सदस्य बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या १५ वर्षांपासून ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजय पाटील यांनी शेकडो तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी ART FX School of Animation हा स्वतःचा ब्रँड अधिकृतपणे सुरू करत पनवेल व परिसरातील नवतरुणांसाठी दर्जेदार शिक्षणाची नवी दारे उघडली आहेत. या अकादमीच्या माध्यमातून ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी अत्याधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ART FX स्कूल ऑफ ॲनिमेशनमध्ये ॲनिमेशनमध्ये पदवी, ॲनिमेशन एफएक्स गेम डिझाइन व डेव्हलपमेंटमध्ये मास्टर, एफएक्स ॲनिमेशन व गेम डिझाइनमध्ये मास्टर, व्हिज्युअल फिल्म मेकिंगमध्ये मास्टर, एफएक्स व कंपोझिटिंगमध्ये मास्टर, एफएक्समध्ये मास्टर, आर्किटेक्चरल व्हिज्युअलायझेशन तसेच ग्राफिक डिझाइन विथ पॉवर ऑफ GEN AI (MOS 3) यांसारखे आधुनिक व उद्योगाभिमुख कोर्सेस उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमुळे तरुणांना देश-विदेशातील संधींसाठी सक्षम बनवण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पराग मोहिते, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका संघटक रामदास पाटील, विधानसभा चिटणीस सुशांत सावंत, समन्वयक अरविंद कडव, तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, विभागप्रमुख धनंजय पाटील, शहर अधिकारी निखिल भगत, विभागप्रमुख हनुमंत खंडागळे यांच्यासह अनेक शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.

युवासेनेच्या या उपक्रमामुळे पनवेलमधील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित करिअरची नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande