
परभणी, 29 जानेवारी (हिं.स.)।
शहरातील कारेगाव उल्का नगरी परिसरात श्री रामदेव बाबा व श्री खाटू श्याम मंदिराचा भूमिपूजन व आधारशिला विधी आनंद अजमेरा व पायल अजमेरा यांच्या हस्ते पूर्ण श्रद्धा व मंत्रोच्चारात पार पडला.
शहरातील कारेगाव उल्का नगरी परिसरात श्री रामदेव बाबा व श्री खाटू श्याम मंदिर उभारणीसाठी स्थानिक रहिवासी गोविंदप्रसाद श्रीनिवास अजमेरा यांनी आपली जमीन दान करून अध्यात्म व सेवाभावाची अनुकरणीय उदाहरण तयार केली आहे. रामदेव कीर्तन संगमच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या या मंदिर प्रकल्पासाठी त्यांनी आपली जमीन दान दिली. मंदिर उभारणीचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी या ठिकाणी तत्काळ बोअरवेलचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या पवित्र कार्यानिमित्त आयोजित भूमिपूजन व आधारशिला विधी आनंद अजमेरा व पायल अजमेरा यांच्या हस्ते पूर्ण श्रद्धा व मंत्रोच्चारात पार पडला.
या जागेवर भविष्यात श्री रामदेव बाबा व श्री खाटू श्याम बाबा यांचे भव्य मंदिर तसेच सभागृह उभारण्यात येणार असून, येथे रामदेव जम्मा जागरणासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जाणार आहेत. हे मंदिर भविष्यात भक्ती, श्रद्धा व सामाजिक एकतेचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis