
बीड, 29 जानेवारी (हिं.स.)।
गल्लीतून गाडी बाहेर घेण्याच्या कारणावरुन बीड शहरातील झमझम कॉलनी भागात दोन गटात वाद झाला. यात तलवारबाजी झाली. दोन्ही गटातील काही जण जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी जखमीचे जबाब घेतले आहेत.
बीड शहरातील झमझम कॉलिनी भागात आपली चारचाकी गाडी घेऊन जात असताना त्यांचा व सेवानिवृत्त पोलिस कर्मचारीयांचा वाद झाला. शाब्दिक चकमकीचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात तलवारीने मारल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून टाके पडले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही लोकही रुग्णालयात अॅडमीट आहेत. शहर पोलिसांनी दोन्ही गटांच्या लोकांचे जबाब नोंदवले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis