जळगाव विमानतळ आधुनिक रडार व धावपट्टी विस्ताराची गरज
जळगाव, 29 जानेवारी (हिं.स.)जळगाव विमानतळावर आजही आधुनिक हवामान रडार, प्रगत लँडिंग सिस्टम आणि लांब धावपट्टीचा अभाव आहे. प्रतिकूल हवामानात विमान उतरताना धोका वाढतो, उड्डाणे रद्द होतात आणि प्रवाशांची गैरसोय होते. पण आता या सगळ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उ
जळगाव विमानतळ आधुनिक रडार व धावपट्टी विस्ताराची गरज


जळगाव, 29 जानेवारी (हिं.स.)जळगाव विमानतळावर आजही आधुनिक हवामान रडार, प्रगत लँडिंग सिस्टम आणि लांब धावपट्टीचा अभाव आहे. प्रतिकूल हवामानात विमान उतरताना धोका वाढतो, उड्डाणे रद्द होतात आणि प्रवाशांची गैरसोय होते. पण आता या सगळ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. सिव्हिल एव्हिएशन कमिटी छत्रपती संभाजी नगर टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी थेट मागणी केली आहे. यात 1. कॅट-१ इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (ILS), 2. आधुनिक हवामान निरीक्षण यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचं… धावपट्टीचा ५,६०० फुटांवरून थेट १०,००० फुटांपर्यंत विस्तार करणं गरजेचं असल्याचं त्यांचं मत आहे. दरम्यान, जळगाव विमानतळाची सध्याची धावपट्टी ५,६०० फूट लांबीची असल्याने येथे केवळ लहान क्षमतेची विमानेच उतरू शकतात. धावपट्टीचा १०,००० फूटांपर्यंत विस्तार झाल्यास मोठ्या क्षमतेची विमाने उतरू शकतील आणि जळगाव विमानतळ कायमस्वरूपी लहान विमानतळ म्हणून मर्यादित राहणार नाही. या पार्श्वभूमीवर जळगावमधील नागरिक संघटना व लोकप्रतिनिधींनी विविध सुविधांसाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास विमान सुरक्षा, प्रादेशिक विकास आणि खान्देशच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande