परभणीत पोलिसांच्या छाप्यात सहा तलवारींसह आरोपी ताब्यात
परभणी, 29 जानेवारी (हिं.स.)। पूर्णा पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय दवाखाना परिसरात राहणाऱ्या एका आरोपीच्या घरावर पोलिसांनी अचानक छापा टाकला असता घरातून सहा तलवारींसह आरोपीस ताब्यात घेण्यात आल्याची घटना घडली. पूर्णा पोलीस ठाणे हद्दीत अवैध तलवारींच्य
पोलिसांच्या छाप्यात सहा तलवारीसह आरोपी ताब्यात


परभणी, 29 जानेवारी (हिं.स.)।

पूर्णा पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय दवाखाना परिसरात राहणाऱ्या एका आरोपीच्या घरावर पोलिसांनी अचानक छापा टाकला असता घरातून सहा तलवारींसह आरोपीस ताब्यात घेण्यात आल्याची घटना घडली.

पूर्णा पोलीस ठाणे हद्दीत अवैध तलवारींच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी पूर्ण शहरातील शासकीय दवाखाना परिसरात राहणाऱ्या पन्नासिंग अर्जु सिंग जुनी याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडवर अचानक छापा टाकला. या छाप्यात सहा तलवारी आणि तीन खंजीर यासह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पूर्ण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे आणि गजानन क्षीरसागर यांनी मिळून केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande