
परभणी, 29 जानेवारी (हिं.स.)।
तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या चितनरवाडी गावातील नागरिक उलगुलान आंदोलकांनी आडगाव ते चितनरवाडी रस्ता आणि पुलाचे बांधकाम पूर्ण केल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानावर बहिष्कार घातला आहे, रस्ता पूल नाही तर मतदान नाही अशी भूमिका गावातील नागरिकांनी तहसिलदार कार्यालयात उपस्थित राहून निवेदनाद्वारे गुरूवारी(दि. २९)व्यक्त केली आहे.
चितनरवाडी हे गाव आडगाव बाजार पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे गेल्या दोन वर्षांपासून गावातील नागरिक रस्ता आणि ओढ्यावरील पुलासाठी शासन दरबारी उलगुलान आंदोलन करून मोर्चे व आंदोलन उपोषण करीत आहेत. त्यावर रस्ता आणि पूल बांधकामासाठी निधी उपलब्ध असून संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे काम थातूर - मातुर काम करून ओढ्यावरील मुख्य पुलाचे काम केले नाही. त्यामुळे गेल्या दोन पावसाळ्यापासून गावातील विद्यार्थी, आजारी व्यक्ती, बाळंत महिला, गंभीर आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी दवाखाना करण्यासाठी येताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहे. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे आजवर गावातील अनेक आजारी महिला दगावल्या आहेत. शाळा, अंत्ययात्रा, बाजार, दवाखाना, शेती, दळणवळण यांसारख्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे गावातील गुलगुलान आंदोलकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. तहसिलदार यांच्या मार्फत गुरूवारी परभणी जिल्हाधिकारी यांना मतदानावर बहिष्कार घातल्याचा ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव आणि गावातील जवळपास ३०० नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis