कोल्हापूरच्या उद्योगांमध्ये मोठी क्षमता : आंतरराष्ट्रीय करारातील चुका ठरू शकतात महागात - एकनाथ बिरारी
कोल्हापूर, 29 जानेवारी (हिं.स.)। “कोल्हापूरच्या उद्योगांमध्ये प्रचंड क्षमता आहे. उत्पादने दर्जेदार असून त्यात नावीन्य आणल्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय करार करताना लहान चुका देखील मोठ्या आर्थिक नुकसानीस कारणीभ
स्मॅक तर्फे निर्यात सेमिनार


कोल्हापूर, 29 जानेवारी (हिं.स.)।

“कोल्हापूरच्या उद्योगांमध्ये प्रचंड क्षमता आहे. उत्पादने दर्जेदार असून त्यात नावीन्य आणल्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय करार करताना लहान चुका देखील मोठ्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात,” असे प्रतिपादन निर्यात क्षेत्रातील अभ्यासक एकनाथ बिरारी यांनी केले. ते

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅक कोल्हापूर संचलित स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल एसईपीसी, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन आयआयएफ कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संलग्न औद्योगिक संघटनांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या “आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इन्कोटर्म्स” या विषयावरील सेमिनारमध्ये बोलत होते. या सेमिनाला उद्योजक, निर्यातदार व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.

सेमिनारचे मुख्य व्याख्याते एकनाथ बिरारी यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील करार प्रक्रिया, इन्कोटर्म्सचा अचूक वापर, जोखीम हस्तांतरणाचा टप्पा, देयक जोखीम व्यवस्थापन, वाहतूक व लॉजिस्टिक्स जबाबदाऱ्या तसेच निर्यात व्यवहारात होणाऱ्या सामान्य चुका याबाबत सविस्तर व प्रात्यक्षिक उदाहरणासह मार्गदर्शन केले.

“कोल्हापूरच्या उद्योगांमध्ये प्रचंड क्षमता आहे. उत्पादने दर्जेदार असून त्यात नावीन्य आणल्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय करार करताना लहान चुका देखील मोठ्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात,” असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

प्रास्ताविकात स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन आय. ए. पाटील यांनी सांगितले की, एसईपीसी अंतर्गत असलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहकार्य करून निर्यातक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. त्या दृष्टीने ही नॉलेज सिरीज सुरू करण्यात आली असून भविष्यातही अशा प्रशिक्षण उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande