
जळगाव, 29 जानेवारी (हिं.स.)राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजुन ४६ मिनिटांनी विमान अपघातात दुःखद निधन झाले. ही घटना काळजाला चटका लावून जाणारी ठरली. स्व. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी बांधव यांचे वतीने २९ जानेवारी रोजी सकाळपासुनच अत्यावश्यक सेवा वगळता पाचोरा शहर दुपारी १२ वाजेपर्यंत शांततेत बंद ठेवण्यात आले होते. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी आ. किशोर पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा न. पा. उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन तावडे, विकास पाटील, दत्ता बोरसे, अजहर खान, प्रविण पाटील, मराठा सेवा संघाचे जिभाऊ पाटील, राहुल बोरसे, अनिल सावंत यांचेसह राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर