
बीड, 29 जानेवारी (हिं.स.)।
फ्लाईंग बर्ड्स अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज, माजलगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या क्रीडा महोत्सवाची सुरुवात हनुमान चौक येथून विद्याथ्यर्थ्यांच्या भव्य संचलनाने झाली. अत्यंत शिस्तबद्ध, एकसंघ व प्रेरणादायी अशा या प्रभात फेरी संचनल्नात परेड, स्केटिंग, डंबेल्स आणि मॅरेथॉन या क्रीडा प्रकारांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
या प्रभात फेरीतून एकता, संघभावना, शिस्त आणि क्रीडाभावना यांचे जिवंत दर्शन माजलगावकरांना अनुभवता आले. या क्रीडा महोत्सवाच्या संचनलनाचे उद्घाटन माजलगाव विधानसभा अध्यक्ष नारायण डक, उपनगराध्यक्ष सहाल चाऊस, डॉ.शंकर जुजगर, बबनराव सरवदे, डॉ. राहुल जेथलिया यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाईंग बर्ड्स अकॅडमीचे चेअरमन पांडुरंग चांडक प्राचार्या सारिका बजाज, ऐश्वर्या चांडक, उपप्राचार्य सचिन गायकवाड, ज्योती बनसोडे, क्रीडाशिक्षक सुखदेव माने, आकाश पवार, स्केटिंग व डंबेल्स मार्गदर्शक कृष्णा गायकवाड, कराटे मास्टर चंद्रमणी डोंगरे, रमेश बाहेती यांनी या प्रभात फेरीच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. शाळेच्या प्रांगणात खऱ्या अर्थाने क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक करताना चेअरमन पांडुरंग चांडक यांनी, शिक्षणाबरोबरच शिस्तप्रिय, जिद्दी व चिकाटी असलेले उद्याचे खेळाडू घडवण्याचे कार्य फ्लाईंग बर्ड्स अकॅडमी सातत्याने करत राहील, असे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ममता शिंगाडे यांनी केले. शालेय विद्यार्थिनींनी कवायती सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis