छोट्या समाजांच्या प्रश्नांवर राज्यपालांसोबत सविस्तर चर्चा
अकोला, 29 जानेवारी (हिं.स.)।राज्यातील विविध छोट्या समाजांच्या राज्यपातळीवरील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच श्रीमती दर्शनादेवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सविस्तर चर्
Photo


अकोला, 29 जानेवारी (हिं.स.)।राज्यातील विविध छोट्या समाजांच्या राज्यपातळीवरील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच श्रीमती दर्शनादेवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस राष्ट्रीय धोबी महासंघाचे अध्यक्ष अनिल शिंदे व महासचिव राजा परदेशी उपस्थित होते.

मुंबई येथील लोक भवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी धोबी समाजासह इतर छोट्या समाजांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक समस्यांचा सखोल आढावा घेतला. यावेळी धोबी समाजाला राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या आरक्षण यादीत समाविष्ट करण्यात यावे, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्या मांडण्यात आल्या.

समाजकार्य, संघटनात्मक बांधणी आणि धोबी समाजाच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अनिल शिंदे यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आले होते. या चर्चेमुळे धोबी समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमाबद्दल विविध स्तरांतून अनिल शिंदे व राजा परदेशी यांचे अभिनंदन करण्यात येत असून, राज्यपातळीवर समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande