जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
लातूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले लातूर, 29 जानेवारी (हिं.स.) :राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित ‘सुधारित निवडणूक कार्यक्रम–२०२६’ आज जाहीर केला. या घोषणेमुळे अहमद
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर


लातूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले

लातूर, 29 जानेवारी (हिं.स.) :राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित ‘सुधारित निवडणूक कार्यक्रम–२०२६’ आज जाहीर केला. या घोषणेमुळे अहमदपूर शहरासह लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदानाचा थरार रंगणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांमध्ये धावपळ वाढली आहे. कमी कालावधीत प्रचार करावा लागणार असल्याने यावेळी निवडणूक लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम:

दि. ३१ जानेवारी २०२६ (शनिवार) : जिल्हाधिकारी निवडणुकीची सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करणार

दि. ०७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान

दि. ०९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) : सकाळी १० वाजेपासून मतमोजणी व निकाल जाहीर

दि. ११ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) : निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध

उमेदवारांची धावपळ,

राजकीय गणितांना वेग

अहमदपूर तालुक्यातील पंचायत समिती गण तसेच जिल्हा परिषद गटांमध्ये इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आयोगाकडून मिळालेला अत्यल्प प्रचारकालावधी पाहता, उमेदवारांना प्रचारासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ३१ जानेवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध होताच खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande