रत्नागिरी : देवरूख महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर विविध स्पर्धा उत्साहात
रत्नागिरी, 29 जानेवारी, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियानांतर्गत विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या विद्यार्थ्यां
रत्नागिरी : देवरूख महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर विविध स्पर्धा उत्साहात


रत्नागिरी, 29 जानेवारी, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियानांतर्गत विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे व मतदानाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमांचा उद्देश होता. याअंतर्गत मतदार जनजागृती प्रश्नमंजूषा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर सादरीकरण व प्रदर्शन अशा विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी, निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आदी विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. रांगोळी व पोस्टर स्पर्धांमधून मतदानाबाबत जनजागृती करणारे संदेश आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व स्वयंसेवकांना मतदार शपथ देण्यात आली. “मी माझा मतदानाचा हक्क निर्भयपणे व जबाबदारीने बजावीन” असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मतदार जनजागृती अभियानांतर्गत आयोजित स्पर्धांचा गुणानुक्रमे निकाल असा - निबंध स्पर्धा : ध्रुवी अशोक कांगणे, सोलिहा सादिक आंबेडकर, ऋतुजा शशिकांत गुरव, रांगोळी स्पर्धा : हर्षदा श्रीपाद नार्वेकर, आदित्य संजय कानार, तन्वी प्रभाकर घाणेकर. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.महाविद्यालय आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर आधारित पथनाट्य तहसीलदार कार्यालयात सादर केले.

उपक्रमांच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुनील सोनावणे, प्रा. सीमा कोरे, प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. पिया मोरे, प्रा. डॉ. मयूरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, प्रा. विजय मुंडेकर, तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच एन. एस. एस. स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. सर्व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande